Shut down your pc quickly - Tricks

           संगणक कांही वर्षापूर्वी मोठ मोठ्या कंपनी, इंडस्‍ट्रीयल एरियामध्‍ये उपयोगात आणला जात होता. सर्वसामान्‍य लोकांसाठी परिकथा वाटावी असं संगणकाच्‍या बाबतीत घडत होतं. जस-जस काळ बदल गेला तस संगणकही सर्वसामान्‍यांच्‍या गरजेचा वस्‍तू बनत गेला. आज सर्वत्र संगणकाचा वापर होताना दिसून येते. विकासाच्‍या दृष्टिने अतिशय महत्‍त्‍वपूर्ण पाऊल म्‍हणावे लागेल.

           संगणक चालू करण्‍याच्‍या प्रक्रियेला Boot होणे असे संभोधले जाते आणि बंद करण्‍याच्‍या प्रक्रियेला Window Shut down करणे असे म्‍हटले जाते. Boot किंवा Shut down करण्‍यासाठी काही वेळ लागत असते त्‍याला Boot time आणि Shut down time म्‍हणतात. संगणक चालू किंवा बंद होण्‍याच्‍या क्रियेला जास्‍त वेळ लागू लागला की माणूस वैतागतो माणसाचा स्‍वभावच आहे ना - 'शिजेपर्यंत थांबतो मात्र थंड होईपर्यंत थांबत नाही' म्‍हणूनच मी आज झटक्‍यात संगणक कसे बंद करावयाचे तेही कोणत्‍याही सॉफ्टवेअरशिवाय या विषयी सांगणार आहे......जरुर वाचा तुम्‍हाला नक्‍कीच आवडेल

    
       यासाठी संगणकाच्‍या रजिस्‍ट्रीमध्‍ये काही फेरफार करावे लागेल. रजिस्‍ट्री म्‍हटल्‍यावर तुम्‍हाला शाळेतल्‍या , बॅंकेतल्‍या  किंवा कंपनीतल्‍या रजिस्‍टर्स आठवले असतील ना ? हो तसच, रजिस्‍ट्रीसुध्‍दा तशाच प्रकारचा रजिस्‍टर समजा. यामध्‍ये संगणकातील सर्व सॉफ्टवेअर संबधी महत्‍त्‍वपूर्ण नोंदी करुन ठेवलेले असते. आपण ऑफिसात ठेवतो तसे. यामध्‍ये कांही नजरचूकीने फेरफार झाल्‍यास प्रोग्रॅम करप्‍ट होण्‍याची शक्‍यता असते त्‍यासाठी सर्वप्रथम रिस्‍टोर पॉईंट तयार करुन ठेवा. 
      Restore Point तयार करण्‍यासाठी Start Menu>  All program > Accessories > System tool > System restore

रजिस्‍ट्रीमध्‍ये जाण्‍यासाठी Start Menu  मध्‍ये सर्वात खाली दिसणा-या Run मध्‍ये ----

regedit असे टाईप करा
जसे......

regedit टाईप करुन OK वर क्लिक करा रजिस्‍ट्री विंडो ओपन होईल
1. HKEY_CURRENT_USER नंतर Control panel त्‍यानंतर Desktop व क्लिक करा. डावाबाजूला एक यादी दिसेल त्‍यामधून HangApp Timeout वर क्लिक केल्‍यानंतर खालील विंडो दिसेल Value set करा 1000
 
 Value data 100 set केल्‍यानंतर OK करा.
त्‍याच यादीमध्‍ये आणखिन एक रजिस्‍ट्री फाईलमध्‍ये बदल करा
2. WaitToKillApp Timeout वर क्लि करा जसे....
Value data मध्‍ये 1000 set करा आणि OK वर क्लिक करा. तुम्‍ही यामध्‍ये 20000 to 1000 दरम्‍यान Value set करु शकता 20000 म्‍हणजे २० सेकंद आणि 1000 म्‍हणजे १ सेकंद टाईम असा अर्थ होतो.

आता परत रजिस्‍ट्रीच्‍या मूळ मेनूमध्‍ये परत या आणि शोधा..
3.HKEY_LOCAL_MACHINE त्‍यानंतर System Currentcontrolset > Control double click
जसे...
डावाबाजूला फाईलची यादी दिसेल त्‍यामध्‍ये WaitToKillService Timeout वर क्लिक करा त्‍याचा Value data 1000 set करुन OK वर क्लिक करा.

परत रजिस्‍ट्रीच्‍या मूळ विंडोवर परत या....
4.HEKY_USERS त्‍यानंतर DEFAULT नंतर Control panel आणि desktop वर डबल क्लिक करा

 यादीमधून HangApp Timeout Value data 1000 set करा OK वर क्लिक करा.
त्‍याच यादी मधून WaitToKillApp Timeout वर क्लिक करा जसे.....
वरील WaitToKillApp Timeout Value data 1000 set करा आणि OK वर क्लिक करा तुमचा Window आता झटक्‍यात Shut down होण्‍यास काही अडचण येणार नाही. हे ट्रिक्‍स तुम्‍हाला कसं वाटलं या विषयी जरुर कळवा.




1 comment:

  1. Thanks Useful Data
    plz post Window 7 shut down pc quickly stricks
    Dilip Baviskar

    ReplyDelete

Pages