How to create new blog step by step guide

           सामान्‍य व्‍यक्‍तीच्‍या हातातील एक जबरदस्‍त आणि अभिनव प्रसारमाध्‍यम असे ब्‍लॉग या संकेतस्‍थळाचे वर्णन करता येईल. समाजाला विविध विषयावरील आपले व्‍यक्तिगत मत कळावे या उद्देशाने व्‍यक्तिने निर्माण केलेले संकेतस्‍थळ अशी ब्‍लॉग या शब्‍दाची व्‍याख्‍या करता येईल. पारंपारीक प्रसारमाध्‍यमांची दादागीरी मोडून काढण्‍याचे सामर्थ्‍य ब्‍लॉगमध्‍ये आहे. मरगळलेल्‍या समाजाला प्रसारमाध्‍यमानी स्‍वातंत्रपूर्व काळात समाजात नवसंजीवनी निर्माण करण्‍याचे कार्य केलेले आहेत तर आजच्‍या काळात समाजात जागृती निर्माण करण्‍यासाठी अनेक प्रसारमाध्‍यम पुढे येत आहेत त्‍यामध्‍ये ब्‍लॉगचे स्‍थानही अन्‍यनसाधारण आहे. त्‍यामूळेच इंटरनेटवरील ब्‍लॉग हा प्रकार झपाट्याने लोक‍प्रीय ठरत आहे.
         ब्‍लॉग हे वेबलॉग या शब्‍दाचे लघुरुपांतर आहे. हा संकेतस्‍थळाचाच म्‍हणजे वेबसाईटचाच प्रकार आहे. ब्‍लॉग हे एक व्‍यक्‍ती किंवा व्‍यक्तिंचा समूह ब्‍लॉग निर्माण करतो. ब्‍लॉगमध्‍ये मजकूर, व्हिडीओज, ऑडिओज, चित्रे आणि वेबलिंक्‍स (सांधे) दिलेले असतात. नविन मजकूर ब्‍लॉगवर लिहिणे किंवा प्रकाशित करणे याला 'ब्‍लॉगिंग' असे म्‍हणतात. ब्‍लॉगवरील लेखांना 'ब्‍लॉगपोस्‍ट' 'एन्ट्रिज' म्‍हणतात. ब्‍लॉग लिहीणा-या लेखकांना ब्‍लॉगर म्‍हणून संबोधले जाते. आज ब्‍लॉगवर कोट्यावधी लेख नविन ब्‍लॉग वेबवर झळकत आहेत. चला तर मग आपणही नविन ब्‍लॉग तयार करुया.....
नविन ब्‍लॉग तयार करण्‍यासाठी आवश्‍यक घटक.....
१. स्‍वत: चा Gmail  ID 

2. नेट कनेक्‍शन 

          वरील दोन्‍ही गोष्‍टी उपलब्‍ध असतील तर ब्‍लॉग तयार करण्‍यासाठी काही अडचण येणार नाही फक्‍त ५ मिनीटात तुमचा ब्‍लॉग तयार होईल.

सर्वप्रथम www.blogger.com या साईटवर तुमच्‍या gmail Id व्‍दारे Log  in  करा.

Log in केल्‍यानंतर Bogger Dashboard open होईल जसे...
   
blogger dashboard वर  New blog असे चौकट किंवा बटन दिसेल त्‍यावर क्लिक करा लगेच दुसरा विंडो उघडेल जसे.....




वरील विंडोजमध्‍ये तुम्‍हाला ब्‍लॉग टाईटल (Title) द्यावे लागेल उदा. Netkari (नेटकरी) , मृगजळ...एक नसलेल अस्तित्‍व 
Address मध्‍ये तुमच्‍या ब्‍लॉगला तुम्‍ही काय अड्रेस देणार आहात हे ठरवावे लागेल. तुमच्‍या नावाने अड्रेस तयार करता येईल. उदा.somnath-gaikwad.blogspot.com  किंवा  netkari.blogspot.in
blog address टाईप केल्‍यानंतर उपलब्‍ध आहे किंवा नाही तपासून पाहिले जाईल उपलब्‍ध नसेल तर sorry this blog address is not available म्‍हणून त्‍याखाली मेसेज दिसेल दुस-या नावाने प्रयत्‍न करा उपलब्‍ध असेल तर blog address is available असा मेसेज येईल available असेल तर सर्वात खाली दिसणा-या Create blog वर क्लिक करा तुमचा ब्‍लॉग तयार होईल. जसे....
तुम्‍ही तयार केलेला ब्‍लॉग डॅशबोर्डवर दिसू लागेल. त्‍याच्‍या खाली एक मेसेज दिसेल Start posting वर क्लिक करा किंवा पेन्सिलचा चित्र दिसत आहे त्‍यावर क्लिक करा ब्‍लॉग पोस्‍टींगचा विंडो उघडेल जसे....

 वरील ब्‍लॉग पोस्‍टच्‍या विंडोमध्‍ये प्रामुख्‍याने दोन गोष्‍टी महत्‍त्‍वाचे आहेत Post समोरील चौकोनात ब्‍लॉगचा Title लिहा खाली मोठा स्‍पेस दिसेल त्‍यामध्‍ये तुमचा विचार , मुद्दे , चित्रे आणि लिंक्‍स तयार करु शकता लेख पूर्ण झाल्‍यानंतर उजव्‍या बाजूला दिसणा-या Publish वर क्लिक करा तुमचा लेख ब्‍लॉगवर प्रकाशित होईल तेही कोणत्‍याही प्रकाशकाशिवाय.

ब्‍लॉग विषयी अधिक जाणून घेण्‍यासाठी पूढील लिंकवर क्लिक करा Blog tips and tricks 

 

2 comments:

  1. सोमनाथ जी खूपच सुंदर ब्लॉग ... आपले जेव्‍हडे धन्‍यवाद मानावे ते कमीच पडतील.आपल्‍या ब्‍लॉग वरिल माहितीमुळे मला व माझ्यासारख्‍या असंख्‍य लोकांना फायदा झालेला आहे.आपल्या कार्यास शुभेच्छा .. आपल्या ब्लॉग मुळे ज्ञानात भर पडते आपल्या या कार्याबद्दल धन्यवाद .

    सुदाम साळुंके जुन्नर
    7588094067

    ReplyDelete
  2. कर्सर effect कसा दिला आहे सर कृपया coad सांगावा

    ReplyDelete

Pages