फेसबुक लिंक ब्‍लॉगवर कसे तयार कराल?(How to add facebook link in your Blog?)

      माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे असा आपण मानतो हे जरी सत्‍य असले तरी आजच्‍या आधुनिेक युगात माणूस माणसापासून खुप दूर जाताना दिसत आहे त्‍याचे अनेक कारणं आहेत. आजचे गतीमान जीवनशैली, विभक्‍त कुटूंब पध्‍दती असे अनेक कारणे जरी असले तरी माणसाचे एकूणच जीवन यांत्रीकपणे होत असल्‍याचे दिसून येते. पारावरच्‍या गप्‍पा कधीच बंद पडले, सणसमारंभातील माणसाचे योगदान दिवसेंदिवस कमी कमी होत आहे. अशाप्रकारे माणसातील माणूस दूर जात असताना माणसांना एकत्रीत आणण्‍यासाठी अनेक संस्‍था,मंडळे पुढे सरसावले त्‍यामध्‍ये अनेक सोशल नेटवर्क मोलाची कामगिरी पार पाडत आहेत. त्‍यामध्‍ये अनेक सोशल नेटवर्क आहेत उदा. ऑर्कूट, गुगल प्‍लस, व्टिटर, फेसबुक,इत्‍यादी अनेक सोशल नेटवर्क माणसा-माणसामध्‍ये संवादाचे माध्‍यम बनत आहेत. अनेक सोशल नेटवर्क असले तरी फेसबुक हा सर्वसामान्‍य माणसापर्यंत पोहचलेला आहे. 
                   अशा सर्वसामान्‍य माणसांपर्यंत पोहचलेल्‍या सोशल नेटवर्क अर्थात फेसबुक लिंक ब्‍लॉगवर कसे तयार करायचे या विषयी आपण पाहणार आहोत की जेणे करुन ब्‍लॉगला भेट देणा-या मित्र-मैत्रिणींना आपल्‍या  फेसबुक अकाऊंट बद्दल माहिती मिळणार आहे.


प्रथम http://www.facebook.com/badges या साईटला भेट द्या त्‍यानंतर तुमच्‍या Facebook Account व्‍दारे Log in व्‍हायला सांगितले जाईल. Log in करा त्‍यानंतर तुम्‍हाला Facebook Badges  चा विंन्‍डो दिसेल......
           वरील विंन्‍डोमधील Profile Badges ऑप्‍शन निवडा म्‍हणजे त्‍यावर क्लिक करा पुढील विंन्‍डो उघडेल..
             वरील विंन्‍डो सगळ्यात महत्‍त्‍वाचा आहे यावर तुम्‍हाला ३ पर्याय दिसतील त्‍यापैकी ३ म्‍हणजे Other या पर्यायावर क्लिक करा. क्लिक केल्‍यावर लगेच तुम्‍हाला खाली लहान बॉक्‍समध्‍ये काही कोड दिसेल त्‍यावर क्लिक करा संपूर्ण कोड निळ्या रंगाने हायलाईट झाल्‍याचे दिसेल. ते Copy करा.  कॉपी करण्‍यासाठी कंट्रोल C किंवा माऊसवरील उजवा बटण क्लिक करुन त्‍यामधील  Copy हा पर्याय निवडून करु शकता. कॉपी केलेला कोड वर्डमध्‍ये किंवा टेक्‍स डाकूमेंटमध्‍ये सेव करा. 

           आता तुमच्‍या Blogger Account मध्‍ये Log  in करा तुमचा डॅशबोर्ड उघडेल..... 
वरील डॅशबोर्डवर तुमच्‍या ब्‍लॉगसमोर एक बटन दिसेल (वर दाखविल्‍याप्रमाणे) त्‍यावर क्लिक करा अनेक पर्यायाचे एक यादी दिसेल त्‍यामधील Layout हा पर्याय निवडा. निवडल्‍यावर पुढील विंन्‍डो दिसेल.....
       वरील Layout विंन्‍डो मध्‍ये तुम्‍हाला Add gadgets पर्याय दिसेल जसे.........

वरील Add a Gadget वर क्लिक केल्‍यावर तुम्‍हाला Gadget यादी दिसेल त्‍यामधील HTML/Java निवडा जसे...
     वरील विंन्‍डोमधील + बटन निवडा त्‍या नंतर एक नोटपॅडसारखे फाईल उघडेल वर Title असे एक रखाना दिसेल ते रिकामे ठेवा व त्‍या खाली लिहिण्‍यासाठी नोटपॅडसारखे रिकामी जागा दिसेल त्‍यामध्‍ये तुम्‍ही कॉपी करुन ठेवलेला कोड paste करा आणि Save करा. Layout वरील तुम्‍हाला Facebook link कोठे दाखवायच आहे हे ठरवून म्‍हणजेच ड्रॅग अॅंन्‍ड ड्रॉप करा आणि Layout वरील बाजूस दिसणा-या Save adjustment या वर क्लिक करा व अशाप्रकारे Facebook link तयार होईल......

धन्‍यवाद !

     लेख आवडल्‍यास खाली दिसणा-या Facebook Like वर क्लिक करायला विसरु नका...... 





No comments:

Post a Comment

Pages