आपला Gmail अधिक सुरक्षित करा.





   चोरी करणे कोणत्‍याही धर्मात पाप मानले जाते. ती चोरी धनाची असो किंवा एखाद्याची गुप्‍त माहिती चोरुन ती इतरांसमोर उघड करणे असो. त्‍याला चोरीच समजले जाते. आजकाल प्रत्‍येक ठिकाणी व प्रत्‍येक क्षेत्रात फसवणूक होत आहे. समाजात जितका शिक्षणाचा प्रसार झाला तितका फसवणूक दिवसेंदिवस वाढू लागली. फसवावे कसे हे सुशिक्षित लोकांनाच कळते अशिक्षित लोकांना एखाद्याला कसे फसवावे हे कळत नाही. जितका शिक्षण जास्‍त तितका फसवणूक जास्‍त याचा अर्थ असा नव्‍हे की शाळेत फसणूक करणे शिकविले जाते तर जे शिक्षण आपण घेतो त्‍या शिक्षणाला नैतिकतेचे अधिष्‍ठान लाभले पाहिजे तरच समाजातील फसवणूक कमी होईल. नैतिक शिक्षण जीवनात खूप महत्‍त्‍वाचे आहे. म्‍हणूनच आज मूल्‍यशिक्षणासारखे अभ्‍यासक्रम शाळा कॉलेजमध्‍ये शिकविला जातो. खरे पाहता या शिक्षणाची गरज का निर्माण झाली ? हे एक खूप मोठे संशोधनाची विषय ठरु शकेल. कारण साधू संताच्‍या या देशात समाजातुन, प्रत्‍येक घराघरातून नैतिक शिक्षण मिळू शकत नाही का ? असो.....................
     

      समाजात जितकी आपली फसवणूक होते त्‍याही पेक्षा कितीतरी पटीने जास्‍त फसवणूक  नेट नावाच्‍या महाजालावर सतत होत असते. लोकांना कसे फसवायचे किंवा ठगवायचे या साठीच चांडाळ चतुर टपलेले असतात. एखाद्याला आपण बुध्‍दीच्‍या जोरावर कसे फसवलो यातच धन्‍यता मानणारे, आणि स्‍वत:ला बुध्‍दीमान समजणारे काही कमी नाहीत या जगात. तेंव्‍हा कोणतेही काम करताना थोडीसी सावधानता बाळगले की आपली जास्‍त फसवणूक होणार नाही.
      
    आज आपण पाहतो नेट वापरणारे आणि त्‍यातल्‍या त्‍यात Email वापरणा-यामध्‍ये ८० ते ९० टक्‍के लोक सर्रासपणे Gmail चा वापर करताना आढळतात. Email हा माणसाचा संदेशवहनाचा एक महत्‍त्‍वाचा दुवा बनलेला आहे. इतकच नाही तर अनेक महत्‍वपूर्ण बाबी आपण Email व्‍दारे करत आहोत. उदा. अनेक आर्थिक व्‍यवहार, व्‍यापार, माहीतीचे देवाण घेवाण, संदेश पोहचविणे असे अनेक कामे आपण मेलव्‍दारे करत आहोत. अशाप्रकारे बहुपयोगी व अत्‍यंत महत्‍त्‍वाचे समजले जाणारे मेल एखाद्याने हॅक करुन त्‍याचा गैरवापर करत असेल तर आपण संकटात सापडतो. आजकाल एखाद्याची गुप्‍त माहिती चोरणे (हॅक करणे) म्‍हणजे बुध्‍दीमत्‍तेचे लक्षण मानले जाते. अशाच हुशारीपोटी संगणकावर असंख्‍य व्‍हॉयरस दिवसेंदिवस वाढत असल्‍याचे दिसून येते. दुस-यांना संकटात टाकून स्‍वत:ला हुशार समजणे अशी हुशारी काय कामाची. म्‍हणून अशा चांडाळ चतुरा पासून स्‍वत:चा बचाव करण्‍यासाठी आणि आपला Gmail अधिक सुरक्षित करण्‍यासाठी सज्‍ज व्‍हा............

    
    या सगळ्यावर एक चांगले उपाय आहे ते उपाय म्‍हणजे 2 – Step verification

2 – Step verification म्‍हणजे नेमके काय?
     
    जे नेट बॅंकींग करतात त्‍याना या बद्धल माहिती असेलच जेंव्‍हा आपण बॅंकेच्‍या होमपेजवरील user name आणि password दिल्‍यानंतर लगेच नोंदणी केलेल्‍या मोबाईलवर एक कोडचा मेसेज येतो ते मेसेज दिलेल्‍या जागी टाईप केला की झाला safe Log in यालाच 2 Step verification म्‍हणतात. हॅकर जरी user name आणि password हॅक केला तरी मोबाईलवर आलेला कोड त्‍याला समजू शकणार नाही कारण मोबाईल आपल्‍याजवळ असते म्‍हणून टू स्‍टेप व्‍हेरीफिकेशन अत्‍यंत सुरक्षित लॉग इन समजला जातो.
      
    चला तर मग जाणून घेऊ 2-Step verification कसे Activate करायचे Step by step……….  

प्रथम आपण नेहमी ज्‍याप्रमाणे Log in करतो तसे Log in करा. तेव्‍हा खालिल विंन्‍डो दिसेल...



तुम्‍हाला उजव्‍या बाजूच्‍या वरच्‍या कोप-यात तुमचा Email Id दिसेल त्‍याच्‍याच (फोटोच्‍या उजव्‍या बाजूला) जवळ एक बटण दिसेल त्‍या ठिकाणी क्लिक केल्‍यावर तुमचा नाव, इमेल आयडी, Account दिसेल. Account वर क्लिक करा.  पुढील विंन्‍डो दिसेल..... 







आता तुम्‍ही Account च्‍या सेटिंग्‍ज या पेजवर आहात. या वर अनेक पर्याय दिसतील त्‍यामूळे गोंधळून जाऊ नका. वरील पर्यायामधून फक्‍त Security हा पर्याय निवडा. Security या बटनवर क्लिक केल्‍यावर पुढील window open होईल....

  




हा पेज अत्‍यंत महत्‍त्‍वाचे आहे कारण या मध्‍ये दोन गोष्‍टी आपण करु शकतो.
१.      तुमच्‍या Account चा password बदलु शकता.
२.      2-Step verification सेट करु शकता.

Password बदलण्‍यासाठी Your password समोरील Change password वर क्लिक करा किंवा आहे तीच password ठेवायचे असेल तर 2 – Step Verification समोरील settings या बटनावर क्लिक करा. Status off असेल. Activation झाल्‍यानंतर on होईल. Settings वर क्लिक केल्‍यावर पुढील window open होईल......






या पेजवरील 2-Step verification चा Setup असेल. यावरील  Start Setup वर क्लिक करा. लगेच पुढील पेज दिसू लागेल...(Setup your phone)








वरील Setup your phone या पेजवर phone number असा कॉलम दिसतो. कॉलमच्‍या अगदी सुरवातीला एक लहान बटण दिसेल ते Country (देशाचे नाव/ध्‍वज) असेल देश निवडा आणि आपला १० अंकी मोबाईल नंबर टाईप करा. खाली दोन पर्याय दिसतील १.Text massage 2. Voice call या मधील text massage (sms) हा पर्याय निवडा send code या बटणावर क्लिक करा. Verification चा पेज उघडेल.....








थोड्याच वेळात तुमच्‍या मोबाईलवर एक कोड येईल. सदरचा कोड टाईप करुन verify या बटणावर क्लिक करा झाला आता तुमचा Gmail Account 2- Step verification व्‍दारे सु‍रक्षित.  

     
       मी एक माध्‍यम......................


   जे मी काहीतरी सांगण्‍याचा / मांडण्‍याचा प्रयत्‍न करतो त्‍याच्‍या पाठीमागे स्‍वत:ला शहाणा समजून घेणे हा हेतू मूळीच नाही. मला जे काही माहीत आहे किंवा इतराकडून समजलेला आहे ते तुमच्‍या सारख्‍या सुपिक डोक्‍यात पेरण्‍याचा प्रयत्‍न करतो. भविष्‍यकाळात माझ्या विस्‍मुर्तीत गेलेला एखादा घटक परत तुमच्‍याकडून प्राप्‍त करता येईल इतकच. मी फक्‍त शेतक-याची भूमिका वटवित आहे असे समजा. शेतकरी आपल्‍याजवळील चांगले बीयांची निवड करुन सुपिक जमिनीत पेरण्‍याचा प्रयत्‍न करत असतो. जर एखाद्याजवळ अतिउत्‍तम बीया असून सुध्‍दा पेरणी न करता तसेच ठेवले तर काय होईल ?  सर्व बीया ठेवल्‍याठिकाणी किडून जातील तेव्‍हा जे मला ज्ञात आहे ते मोडक्‍या तोडक्‍या स्‍वरुपात आपल्‍यासमोर मांडण्‍याचा एक प्रामाणिक प्रयत्‍न. काही लोक आपले विचार मांडण्‍यासाठी भाषणाच्‍या माध्‍यमातून, कृतीतून, संभाषणातून, लेखणीतुन, इतर अन्‍य मार्गाने इतरापर्यंत पोहचविण्‍याचा प्रयत्‍न करतात तर लेखणी हे माध्‍यम माझ्यासाठी अधिक सुकर वाटले म्‍हणून मी लेखणीव्‍दारे मांडण्‍याचा प्रयत्‍न करतो.  मी फक्‍त एक माध्‍यम आहे...... बस इतकच.






No comments:

Post a Comment

Pages