पुस्तक- द मॅजिक ऑफ थिंकींग बिग
1.
तुम्हच्या वातावरणाबाबत
सजग रहा. शारीरिक खाद्य ज्याप्रमाणे शरीराला घडवतं, त्याचप्रमाणे मानसिेक खाद्य मनाला घडवत असतं.
2.
तुमच्या वातावरणाला तुमच्या
विरुध्द नव्हे तर तुमच्या बाजूनं कामाला लावा. दबावशक्तींना- नकारात्मक, तू हे करु शकणार नाहीस म्हणणा-या
लोकाना बळी पडून पराभूतासारखा विचार करु नका.
3.
खुज्या विचाराच्या
लोकांना तुमचे पाय ओढू देऊ नका.तुमच्या पडण्यामध्ये मत्सरी लोकांना आनंद मिळत
असतो. त्याना असा आनंद मिळू देऊ नका.
4.
यशस्वी लोकांनाच फक्त सल्ला
विचारा. तुमचं भविष्य महत्वाचं आहे. स्वत: अपयशी असणा-या फुकटच्या सल्लागारांच्या हाती
ते सोपवण्याचा धोका पत्करु नका..
5.
भरपूर मानसिक सूर्यप्रकाश
मिळवा. नवनव्या गटांमध्ये सामील व्हा. करण्यासाठी नव्या नव्या आणि उत्साह
वाढवणा-या गोष्टींचा शोध घ्या.
6.
तुमच्या वातावरणातून विचार
– विषाला हद्दपार करा. नकारात्मक गप्पांपासून दूर रहा. इतर लाकांबद्दल बोला, पण सकारात्मकच.
7.
तुमच्या प्रत्येक गोष्टीत
उच्च दर्जाची कास धरा. दुस-या कुठल्याही मार्गानं जाणं तुम्हाला परवडणारं नाही.
No comments:
Post a Comment