पूर्वी पोस्ट ऑफिस हे पत्र पाठविण्याचे किंवा मिळण्याचे एकमेव माध्यम होते. परंतु एकंदरीतच पोस्टाचा कारभार संथ गतीने चालतो. आज टाकलेले पत्र नियोजित स्थानी केंव्हा पोहोचेल याचाही भरवसा नसतो. म्हणूनच पोस्टखात्याव्दारे होणा-या पत्रव्यवहाराला 'स्नेल मेल' असे नाव मिळाले. गोगलगाईच्या गतीने चालणारी ती पत्रव्यवहाराची पध्दत होती. इ मेल आगमनाबरोबर स्नेल मेलचे तात्काळ 'क्विक मेल' मध्ये रुपांतर झाले. आता इ-मेलव्दारे तुमचे पत्र सहस्त्रावधी किलोमीटर्सचा प्रवास करुन अक्षरश: क्षणार्धात तुमच्या मित्राला मिळू शकते. इ-मेल हे सध्या संपर्काचे सर्वांत लोकप्रिय साधन आहे. आज दररोज इंटरनेटच्या माध्यमातून अब्जावधी इ-मेलचे आदानप्रदान होत असते.
अशा लोकप्रिय ठरलेल्या इ-मेल मग ब्लॉगमध्ये नसेल तरच नवल. आज प्रत्येक ब्लॉग, वेबसाईटमध्ये इ-मेल नोंदणी फॉर्म असल्याचे दिसून येते त्यातच स्टाईलीश इ-मेल बॉक्स असेल तर मग वाचकाचे लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहणार नाही.तर आज आपण स्टाईलीश इ-मेल बॉक्स कसे तयार करायचे पाहणार आहोत........
add gadgets निवडल्यानंतर Gadget यादी दिसेल त्या यादी मधून HTML/Java निवडा एक बॉक्स उघडेल त्यामध्ये Title रिकामी ठेवा त्याखालील मोठ्या बॉक्समध्ये खालील कोड कॉपी करुन पेस्ट करा.
वरील कोडमध्ये खालील कोड शोधा आणि हायलाईट केलेल्या ठिकाणी तुमचा feedburner Id टाईप करा
'http://feedburner.google.com/fb/a/mailverify?uri=blogspot/KbpWa '
वरील सर्व दुरुस्ती केल्यानंतर सेव करा.त्यानंतर Layout वरील Save arrangement वर क्लिक करा.
अशाप्रकारे तुमचा स्टाईलीश इ-मेल सबस्क्रिपशन फॉर्म तयार .........
No comments:
Post a Comment