मृगजळामागे पळता पळता
स्वत:लाच हरवून बसलो आहे
अस्तित्वाच्या शोधात आता
मीच एक मृगजळ बनलो आहे
मित्रानो माणसाचे जीवनच एक मृगजळासारखे भासते कारण जे आपल्याला सापडत नाही त्याच्या मागे सतत धावण्याचा माणसाचा स्वभाव आहे नाही का ? कोणी अपाट संपत्ती मिळविण्यासाठी वाटेल ते करायला तयार होतात आपल्याच माणसाचा प्राण घ्यायला सुध्दा माणूस मागेपूढे पाहत नाही. इतकच नाही तर आजाराने जर्रजर झालेला माणूससुध्दा जगण्यासाठी सतत धडपडत असतो त्याला माहीत असतं की आपण आज नाही उद्या मरणार आहे तरी सुध्दा तो मृत्यूला जिंकण्याचा अयशस्वी प्रयत्न करतो. तान्हेनं व्याकूळ झालेला माणूस मृगजळाला पाणी समजून त्याच्यामागे पळण्यासारखाच आहे.
जीवनामध्ये प्रत्येकजण काहीतरी मिळविण्यासाठी सतत धडपडत असतात काहीजण यश मिळवितात, तर काहीजण ऐश्वर्य मिळवितात, तर काही जण प्रशिध्दी मिळवितात,शेवटी सगळं इथेच सोडून परतीच्या वाटेला लागाव लागत हे ज्याना कळत, उमगत ते मृगजळामागे न लागता आपल्या कर्तूत्वानं माणसांच्या ह्रदयामध्ये कायम घर करुन जातात.
हे जीवनच अंत नसलेल्या क्षितीज्यासारखा,मृगजळासारखा वाटत असल्यामूळे मी माझ्या blog ला मृगजळ..........एक नसलेलं अस्तित्व असं नाव दिलं ते तुम्हाला कस वाटल जरुर कळवा.
No comments:
Post a Comment