टॅलण्‍टेड माणसं



दु:

न मावणारं दु:ख नेहमीच जीवघेणं असतं. कारण तुमचा जीवच तेव्‍हा दु:खापेक्षा लहान झालेला असतो. तेव्‍हा माणसाने नेहमीच दु:खापेक्षा मोठं व्‍हायचं ध्‍येय ठेवावं. दु:ख मावल्‍यावर भांड्यात वर रिकामी जागा राहील इतकं मोठं व्‍हावं. अर्थात हे झालं स्‍वत:च्‍या बाबतीत. आपल्‍याला होणा-या यातनांसाठी मोठं भांडं वापरायचं पण इतरांच्‍या संदर्भात एका अश्रूनेही भांडं ओसंडून जाईल इतकं छोटं ठेवायचं.


टॅलण्‍टेड माणसं

टॅलण्‍टेड माणसं तर फार उपद्रवी होऊ शकतात. बुध्‍दी हे एक प्रचंड शस्‍त्र आहे. मी तर अस्‍त्रच म्‍हणतो. आणि ते स्‍वयंचलित असतं, हा मोठा धोका. बुध्‍दीला विशाल मनाचं मैदान लाभलं तर आयुष्‍य एखाद्या खेळासारखं रंगवता येतं. तेच मन जर कुरुक्षेत्रासारखं झालं तर मग किती अक्षौहिणी जीव बरबाद झाले हे मोजायचं नाही. हत्‍या ही हत्‍याच. ती एका मानवी मनाची केली काय किंवा असंख्‍यांची काय, सारखंच. वृती हीच शक्‍ती. भरडले किती जातात हे गौण.

विचारशक्‍ती

ज्‍या माणसाला विचारांची सोबत आहे त्‍याला कोणतंही अंतर लांब वाटत नाही. एकदा विचारांची साखळी सुरु झाली की, त्‍या साखळीपेक्षा रस्‍ता कधीच लांब नसतो.

सुरक्षा

सुरक्षेची जेवढी मागणी वाढवत न्‍याल तेवढं असुरक्षित वाटत राहतं.मुळातच आयुष्‍य असुरक्षित असतं, हे मान्‍य करावं.रक्षण कुणापासून करणार? कोण करणार? रक्षक ठेवून कुणाचे प्राण वाचले आहेत ? म्‍हणूनच अस्तित्‍वाच्‍या हातात सगळं द्यायचं आणि मस्‍तीत जगायचं. आपण ठरवलं होतं, त्‍यापैकी बालपणापासून काय काय घडवू शकलो? मागून किती आणि न मागता किती मिळालं, हे फक्‍त प्रत्‍येकाने आठवून पाहावं.

                                            --------------------व.पु.काळे


No comments:

Post a Comment

Pages