आज माणसाचे जीवन अतिशय धकाधकीचे बनलेले आहे. चार गोष्टी बोलायला सुध्दा
कोणाजवळ वेळ नाही.चार गोष्टी तर लांबच राहीले नविन आलेला email सुध्दा उघडून पहायला वेळ नाही. विज्ञान
तंत्रज्ञानाच्या युगात माणूस पुरता बाहुली बनलेला आहे.अशा वेळी माणूस प्रत्येक
काम करताना सॉर्टकट मार्गाचा अवलंब करण्याचा प्रयत्न करतो आणि आपले काम
दर्जेदारपणे करण्याकडे लक्ष देतो. आपल्या जीवनात अॅटोमेशन आणण्यासाठी सतत
प्रयत्नशिल असतो. म्हणजेच अमुक एक काम असे आपोआप घडले तर कसे होईल याचा सतत
विचार करत असतो याच कल्पनेपोटी अनेक नवनविन यंत्राचा,
साधनांचा शोध लागत गेला यामूळे मानवी जीवन
अधिक सुखकर बनण्याऐवजी अधिक गुंतागुतीची बनत गेली. असे असताना देखील माणूस नाविन्याचा
ध्यास व शोध सोडलेला नाही. नाविन्याचा ध्यास घेऊन आपले जीवन अधिक सुखकर बनविणा-यांसाठी
पर्यायाने सर्वांसाठीच एक अत्यंत उपयुक्त असे (नेट सेवा) नेट अॅप विषयी मी माहिती देणार आहे. त्या अॅप्सचे /साईटचे नाव आहे IFTTT. हो खरच IFTTT असेच या साईटचे नाव आहे. IFTTT खरे तर सॉर्ट नाव आहे त्याचे पुर्ण नाव IF THIS THEN THAT असे आहे. मराठीतच सांगायचे झाल्यास ‘जर असे घडल्यास
तर तसे करा’
तर
चला मग IFTTT आहे तरी काय ? या
विषयी अगदी सविस्तर पाहू या......
Account opening Form पुढील प्रमाणे.......
ifttt.com या वेबसाईटला भेट दिल्यावर वरील प्रमाणे Home page दिसेल.
त्यावर तुम्हाला एक JOIN IFTTT असे बटण दिसेल त्यावर
क्लिक केल्यावर नविन IFTTT Account उघडण्यासंबधी एक
माहितीवजा फॉर्म येईल. त्यामध्ये प्रामुख्याने User Name, Email
Account, password conform password असे सर्व माहिती भरल्यानंतर
तुमचा ifttt Account उघडले जाईल.User Name तुम्ही कोणतेही देवू शकता उदा.तुमचे स्वत:चे नाव,आडनांव किंवा काहीतरी त्यानंतर Email Account तुमचे
कोणतेही एखादे(Gmail, Hotmail, yahoo, Rediffmail etc.) इमेल
द्या. Password देताना तुम्हाला लक्षात राहिल किंवा ते
पुर्णपणे सुरक्षित असेल असे कोणतेही एक password तयार करा.conform
password वर दिलेले password पुन्हा टाईप
करुन Create account करा झाले तुमचे ifttt Account तयार. हे अकाऊंन्ट उघडण्यास कोणते शुल्क भरावे लागणार नाही. जेव्हा
लॉग इन करुन आत प्रवेश कराल म्हणजे Dashboard वर असाल तेव्हा
खालील प्रमाणे विंन्डो दिसेल.
Dashboard म्हणजेच Home page वर तुम्हाला अनेक सेवांची यादी
दिसेल त्या सेवांना ‘रेसिपी’ (Recipes)
म्हणतात. या मध्ये अनेक सेवा उपलध्द आहेत त्यापैकी काही सेवां
विषयी....
1.Facebook वर अपलोड केलेली माहिती, फोटो,
जर Google plus, twitter, Orkut इत्यादीवर आपोआप अपलोड करणे
शक्य होईल.
2.Gmail वर आलेला मेल कळण्यासाठी message ची सुविधा.
3.तुमच्या Blog
वर पोस्ट केलेली माहिती Facebook वर दिसते.
4.एखादी माहिती photo इतर कोणत्याही सोशल साईटवर अपलोड केल्यावर
ते Google drive, सॅंन्डी बॉक्सवर आपोआप सेव होईल.
5.एखादे Email काही दिवसानंतर मित्रांना पाठवायचे आहे पण नंतर लक्षात राहील की सांगता
येत नाही तेव्हा या सुविधांचा वापर करुन घेता येईल.
6.विशिष्ट विषय किंवा शब्द
असलेल्या ईमेल मधील attachments आपोआप Dropbox,
google drive वर सेव करु शकता.
7.पाऊस पडण्याची शक्यता असल्यास तसे आदल्या
दिवशी Email किंवा SMS व्दारे
तसे कळविले जाते.
8.जर फेसबुकवरील profile picture मध्ये बदल केल्यास आपोआप
व्टिवटर अकाऊंटमधील profile picture मध्ये बदल होते.
असे अनेक सेवांचा खजिना तुम्हाला या वर
आढळून येईल. या साईटची आणखिन एक विशेषता म्हणजे वापरण्यास सोपे आणि सुलभ. असे
भरपूर उपयुक्त सेवा या साईटवर उपलध्द आहेत त्याचा एकदा आवश्य वापर करा आणि
सांगा......
वेबसाईटचे
नाव- http://ifttt.com
No comments:
Post a Comment