स्‍वत:चे डोमेन तयार करा अगदी मोफत (How to create your own domain for free)

           
                  WWW म्‍हणजेच 'वर्ल्‍ड वाइड वेब' हा आता जगातील सर्व क्षेत्रातील माहितीचा एक अफाट संग्रह आहे. वेबवरील विशिष्‍ट माहितीच्‍या दस्‍तऐवजाला 'पेज' असे नाव आहे. माहितीची अशी अब्‍जावधी पेजेस् वेबवर उपलब्‍ध आहेत, आणि त्‍यांमध्‍ये दररोज लक्षावधी पेजेसची भर पडत आहे. वर्ल्‍ड वाइड वेबचा प्रारंभिक उद्देश विज्ञान आणि शिक्षण एवढाच होता, परंतु मानवी जीवनाच्‍या समाजकारण,अर्थकारण,राजकारण वगैरे अन्‍य क्षेत्रावरी वेबने आपला प्रभाव निर्माण केला आहे. वर्ल्‍ड वाईड वेब आता WWW या तीन डब्‍ल्‍यू अक्षरांनी ओळखले जाते.
                   आपण ब्‍लॉगमध्‍ये जे लेख सादर करतो त्‍याचा अड्रेस मात्र http://blogname.blogspot.in असे दर्शविले जाते. प्रत्‍येक ब्‍लॉगरला वाटते की आपले ब्‍लॉग अड्रेसही www.name.com असे असले तर किती चांगले होईल असे वाटत असते. असेच काहीतरी हटके करण्‍याचा प्रयत्‍न प्रत्‍येक ब्‍लॉगर करत असतो. पण असे अनेक डोमेन नेम आहेत की जेणेकरुन त्‍यासाठी प्रत्‍येक वर्षाला प्रचंड पैसे मोजावे लागतात. जे व्‍यावसायिक असतात ते व्‍यवसाय वाढविण्‍यासाठी पैसे मोजण्‍यासाठी तयारही असतात. पण माझ्यासारखे असंख्‍य ब्‍लॉगर आहेत की एक आवड म्‍हणून लेखन करत असतात त्‍याना एवढे पैसे मोजणे शक्‍य नसते.त्‍यासाठीच हे एक प्रयत्‍न....    
          आज आपण नेट पाहतो की www.name.com, .in .co.in, .gov, .edu,  .org  अशा स्‍वरुपातील डोमेन नेम पाहतो. वरील डोमेन नावासाठी खूप पैसे खर्च करावे लागते. त्‍याच्‍यासारखा  किंवा त्‍याच्‍या जवळपास सारखे वाटणारे डोमेन नेम कसे तयार करायचे तेही अगदी मोफत ते या लेखव्‍दारे पाहणार आहोत.......



          मोफत डोमेन नेम पुरविणारे असे असंख्‍य वेबसाइट आहेत त्‍यातल्‍या त्‍यात वापरण्‍यास सोपे असणारे चांगले सुविधा प्रधान करणा-या वेबविषयी आपण पाहणार आहोत. त्‍यामध्‍ये प्रामुख्‍याने मला आवडलेले वेबसाईट म्‍हणजे http://www.freedomain.co.nr/ हा होय. या वेबसाईटमधूनच मी माझे एक डोमेन नेम तयार केलेला आहे -www.somnathgaikwad.co.nr तुम्‍हालाही नक्‍कीच आवडेल. चला तर जाणून घेऊ www.freedomain.co.nr या वेबसाईट विषयी......

        या वेबसाईटमध्‍ये प्रवेश केल्‍यानंतर तुम्‍हाला होमपेजवर फ्रीडोमेन चेक करण्‍यासाठी सांगितले जाईल तुम्‍हाला आवडणारे नाव देऊन ते डोमेन उपलब्‍ध आहे की नाही चेक करा. उपलध्‍द असेल तर रजिस्‍ट्रेशन करण्‍यास सांगितले जाईल मग रजिस्‍ट्रेशन करा. या वेबवर तुम्‍हाला www.yourname.co.nr सारखे डोमेन नेम तयार करण्‍याची सुविधा मिळते.
          त्‍यानंतर चांगले सुविधा देणा-या वेबमध्‍ये http://www.unonic.com/ हे एक वेबसाईट आहे...
        या साईटवर www.yourname.net.tf  असे सुविधा दिली जाते.तसेच तुमच्‍या नावावरुन तुमच्‍या मित्राना नातेवाईकाना फ्री ईमेल सुविधा पुरविले जाते. उदा. yourfriendsname@yourname.net.tf  

यासारखे असंख्‍य वेबसाईटस्  आहेत त्‍याचे खाली लिंक देत आहे....

 वेबलिंक्‍स
आगामी लेख..........
  •  फेसबुक लाईक बटन ब्‍लॉगपोस्‍ट खाली कसे तयार कराल (How  to create facebook like button under  blog post
  • आपले ब्‍लॉग टेंम्‍पलेट सजवू या ( Design your own blog template)
  • ब्‍लॉगपोस्‍टखाली नेव्‍हीगेशन बटन तयार करा ( How to add navigation button under blog post) 
  • नविन टेंम्‍पलेट वापरा सहजतेने ( How to use custom blog template ) 
    
         लेख आवडल्‍यास खाली दिसणा-या फेसबुक लाईक बटनवर क्लिक करायला विसरु नका.... 
लेख तुमच्‍या ईमेलवर मिळविण्‍यासाठी ब्‍लॉगच्‍या कोप-यात दिसणा-या चौकटीत तुमचा ईमेल अड्रेस जरुर लिहा. 

No comments:

Post a Comment

Pages