नविन टेंपलेट कसे वापराल (How to use new custom template in your Blog ?)

            एखादे आधुनिक तंत्रज्ञान मानवी जीवनात कसे अमूलाग्र परिवर्तन घडवून आणते याचे संगणक हे उत्‍तम उदाहरण आहे. संगणकाच्‍या बरोबरच इंटरनेटने आपल्‍या जीवनशैलीवरही विलक्षण प्रभाव निर्माण केला आहे. महत्‍त्‍वाची गोष्‍ट अशी की, या क्रांतिकारक परिवर्तनाचे आपण साक्षीदार आहोत.आपल्‍या डोळ्यासमोर वर्तमानकाळातच परिवर्तनाचा हा ओघ समाजाच्‍या सर्व थरांत वेगाने पसरत चालला आहे.

            आपण मग मागे का राहायचे म्‍हणजेच ब्‍लॉगवर एकच एक टेंपलेट किती दिवस म्‍हणून वापरणार आहोत. आपणही काळाबरोबर एक पाऊल  पुढे ठेऊ या. नवनविन टेंपलेट आपल्‍या ब्‍लॉगसाठी कसे वापरायचे आपण आज पाहणार आहोत.........
             नविन टेंपलेट वापरण्‍यापूर्वी तुमच्‍या टेंपलेटचा बॅकअप जरुर घ्‍या..
बॅकअप कसे घ्‍यायचे ?
            १. प्रथम ब्‍लॉगर अकाऊंटवर लॉगइन करा.
         
            २. त्‍यानंतर डॅशबोर्डवरील नविन ब्‍लॉग लिहीताना ज्‍या चित्रावर क्लिक करतो त्‍याच्‍या उजव्‍या बाजूला अजून एक चित्र दिसते (पोस्‍ट नावाचा) त्‍याच्‍या उजव्‍या बाजूला एक लहान बटन दिसते त्‍यावर क्लिक करा.
  
            ३. अनेक ऑप्‍शन असलेला एक यादी दिसेल त्‍या यादीमधील Template हा पर्याय निवडा. 

                 वर दिसणा-या विंन्‍डोप्रमाणे पर्यायाचे यादी दिसेल त्‍यामधील Template हा पर्याय निवडा त्‍यानंतर पुढील विंन्‍डो उघडेल....


                  वर दिसणा-या विंन्‍डोमधे वर उजव्‍या बाजूला एक चक्रासारखा चित्र दिसतो ठिक त्‍याच्‍या डाव्‍या बाजूला Backup / Restore असा पर्याय दिसतो ते पर्याय निवडा...... 

वरील विंन्‍डोमधील Download full template क्लिक करुन तुमचा Template Download करुन घ्‍या.. Download करताना सदरील फाईल कोठे सेव करायचे विचारले जाईल तुम्‍हाला तुमच्‍या हार्ड डिस्‍कवर कोठे सेव करायचे ते ठरवा व सेव करा.

         या नंतर नविन ब्‍लॉग टेंपलेट अपलोड कसे करायचे?  म्‍हणजे वापरायचे हे पाहूया.....

 वरील चित्रामध्‍ये Download full template या पर्यायाखाली upload a template from a file on your hard drive असा पर्याय वजा रखाना दिसेल इतर वेबसाईटवरुन डाऊनलोड करुन घेतलेला टेंपलेट कोठे सेव करुन ठेवलेला आहे Brose करुन त्‍याचे पाथ द्या व खाली दिसणा-या Upload या बटनावर क्लिक करा.तुमचे नविन टेंपलेट नव्‍या नवलाईने जणू नविन नवरीप्रमाणे नटून तयार होईल..... ब्‍लॉगमधील कंन्‍टेंट तेच असेल फक्‍त आपण वरील कपडे बदललेला आहे Just like old wine new bottle. 

      हे सर्व करण्‍यासाठी टेंपलेट कोणत्‍या वेबसाईटवरुन डाऊनलोड करुन घ्‍यायचा असा प्रश्‍न तुमच्‍यासमोर पडला असेल त्‍याचा व्‍यवस्‍थाही खालील लिंकव्‍दारे केलेला आहे. या साठी अनेक वेबसाईटवर फेरफटका तुम्‍हाला मारावे लागणार नाही कारण १०० वेबसाईटचा लिंक केवळ एकच वेबसाईट तुम्‍हाला पुरविणार आहे.
कोणतेही फाईल डाऊनलोड करायचे म्‍हणजे तुमच्‍या समोर एक प्रश्‍न बेडसावत असेल की फाईल किती मोठी असेल? त्‍यासाठी आपले किती वेळ खर्च होणार आहे? घाबरु नका.... टेंपलेट फाईल अत्‍यंत लहान एखादे गाण्‍यापेक्षाही कितीतरी पटीने लहान फाईल असते म्‍हणजे त्‍याचे साईज kb मध्‍ये असते. त्‍यासाठी न घाबरता टेंपलेट फाईल डाऊनलोड करा. ते XML या स्‍वरुपातील असते.

डाऊनलोडसाठी वेबसाईट -  Download free blog template



No comments:

Post a Comment

Pages